समीर कुलकर्णीला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

November 20, 2008 10:41 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, पुणेमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी समीर कुलकर्णी यास 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. खडकी इथल्या धर्मगुरूवरच्या हल्ल्या प्रकरणी समीर कुलकर्णी याला खडकी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आणि सरकारी वकिल बी एन कदम यांच्या युक्तीवादानंतर समीर कुलकर्णी याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचे दोन्ही साथीदार संतोष कसबे आणि राजेंद्रराम लोणारे या दोघांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान समीर कुलकर्णी आणि त्याच्या दोन साथीदारांना गुरुवारच्या दिवसाकरता येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. आणि त्यानंतर समीर कुलकर्णी ला नाशिक एटीएस च्या ताब्यात देण्यात येईल.

close