विराटला बोट दाखवणं पडलं महागात

January 5, 2012 12:03 PM0 commentsViews: 13

05 जानेवारी

विराट कोहलीची मैदानावर कामगिरी चांगली होत नाही. त्यातच आता शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याच्या मॅच फीतली पन्नास टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. सिडनी टेस्टच्या दुसर्‍या दिवशी बाऊंडरी जवळ फिल्डिंग करताना प्रेक्षकांकडे बघून त्याने राग व्यक्त केला. तसा त्याचा फोटोही प्रसिद्ध झाला. आणि त्याचा फटका त्याला बसला आहे. मॅच रेफरींनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली. विराटनेही ट्विटरवर झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. पण क्रिकेटरना प्रेक्षकांचा विरोध करायचा अधिकार नसतो असंही विराट म्हणाला.

close