लंडनच्या म्युझियममध्ये लवकरच माधुरीचा मेणाचा पुतळा

January 5, 2012 12:28 PM0 commentsViews: 9

05 डिसेंबर

आपल्या खळखळत्या हास्याने अनेकांना घायाळ करणारी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा मेणाचा पुतळा आता लंडन येथील मॅडम मादाम तुसाँ म्युझियममध्ये लवकरच बसवण्यात येणार आहे. माधुरीची आता पर्यंतची कारकीर्द आणि तिला मिळालेले अनेक पुरस्कारामुळे माधुरीचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. यासाठी अनेक चाहत्यांनी म्युझियमला आग्रहाची मागणी केली होती. खुद्द माधुरीने याबद्दल टिवट् करुन बातमीला दुजोरा दिला. आपला पुतळा बसवला जाणार हा माझ्यासाठी मोठा सन्मानचं आहे असं माधुरीनं म्हटलं आहे. म्युझियमच्या कलाकारांनी पुतळ्यावर काम सुरु केलं आहे, यासाठी मुंबईत माधुरीने पुतळ्यासाठी मोजमापही दिले आहे. हा पुतळा मार्चपर्यंत म्युझियममध्ये दाखल होईल. या अगोदर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीजचे पुतळे म्युझियममध्ये बसवण्यात आली आहे यामध्ये बिग बी, ऐश्वर्या राय, किंग खान, करिना कपूर अशा काही स्टार्सची आधीच वर्णी लागलेली आहे. तेव्हा माधुरीच्या फॅन्ससाठी ही खुशखबर आहे हे नक्की..

close