राजकारणासाठी पोटच्या गोळ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

January 5, 2012 2:05 PM0 commentsViews: 5

05 डिसेंबर

तिसरे अपत्य जन्मल्यामुळे आपल्याला राजकारणामध्ये अडचणी येतील. शिवाय शासकीय सुविधा मिळणार नाहीत म्हणून जन्मदात्यानेच बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जालना जिल्हयातील चांदई टेपली येथे ही क्रुर घटना घडली. कैलाश भोसले आणि त्याच्या पत्नीनी हा क्रुर प्रकार केला. तिसर्‍या बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला आता राजकारणामध्ये अडचणी येतील अशी समजुत झाल्यानंतर कैलास भोसले आणि त्याच्या पत्नीनी बाळाला आपटून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवान यातून बाळ वाचले. सध्या या बाळाला जालन्यातील एका शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. दोघा नवरा बायकोविरुध्द हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

close