महायुतीच्या बैठकीतून नामदेव ढसाळ नाराज होऊन बाहेर पडले

January 5, 2012 2:29 PM0 commentsViews: 6

05 जानेवारी

महायुतीतला जागावाटपासंबंधीचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची शिवसेना भवनात बैठक पार पडली. पण या बैठकीत आरपीआयवर नाराज होऊन नामदेव ढसाळ बैठकीतून बाहेर पडले. महायुतीत आपल्याला काही स्थान नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ढसाळ यांना पत्रकारांनी झालेल्या बैठकीबदल विचारले असता आरपीआयबद्दल आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

एक्याच्या काळात आम्ही अनेक घटकपक्षांचा प्रयोग केला पण आता आरपीआय त्याचे काही महत्व राहिले नाही. आरपीआयच्या लोकांना आता मस्ती चढली आहे, त्यांना कोणाचे काही घेणं देणं नाही असा आरोप ढसाळ यांनी केला. जसा आठवलेंना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर आम्हालाही निर्णय घेता येऊ शकतो असा इशाराही ढसाळ यांनी दिला. ढसाळ यांची नाराजी दुर करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी फोन करुन समजूत काढली तसेच आठवले यांनीही झालेल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे पण अजूनही ढसाळ नाराज आहेत.

close