मायावतींविरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली

January 5, 2012 5:31 PM0 commentsViews: 5

05 जानेवारी

उत्तर प्रदेशात निवडणूक रणधुमाळीला चांगलाच रंग चढू लागला आहे. मुख्यमंत्री मायावतींविरोधात राज्याच्या लोकायुक्तांकडे आज एक तक्रार दाखल करण्यात आली होती. पण लोकायुक्तांनी ही तक्रार फेटाळून लावली आहे. बेकायदेशीर दारु विक्री व्यवहारातून मायावतींना अडीचशे कोटींचा फायदा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. पण तांत्रिक मुद्द्यावरुन ही तक्रार फेटाळल्याचे लोकायुक्तांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार लोकायुक्तांकडे नाही. शिवाय योग्य प्रक्रियेतून ही याचिका दाखल करण्यात आली नव्हती आणि हा पब्लिसिटी स्टंटसुद्धा असू शकतो, असं लोकायुक्तांनी सांगितले.

close