दिग्विजय सिंग पुन्हा ‘फोटो’वरुन अडचणीत

January 5, 2012 5:41 PM0 commentsViews: 3

05 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका फोटोवरुन दिग्विजय सिंग पुन्हा अडचणीत सापडले आहे. या फोटोमध्ये संघाच्या एका कार्यक्रमात माजी सरसंघचालक राज्जू भैय्या आणि अशोक सिंघल यांच्याबरोबर दिग्विजय सिंग बसले आहे. या फोटोवरुन दिग्विजय यांचा संघाशी संबंध असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पण दिग्विजय सिंग यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. कार्यक्रमात जाण्यापूर्वी काँग्रेसकडून परवानगी घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय संघाच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी झालो, याचा अर्थ आपण संघाच्या विचारसरणीचे आहोत, हे सिद्ध होत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

close