राष्ट्रवादीला 55 जागा ; उद्या बैठक ?

January 9, 2012 5:10 PM0 commentsViews: 5

09 जानेवारी

काँग्रेस राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी 65 जागांची मागणी करत असली तरी 55 जागांच्या आसपास तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती उच्चपदस्त सूत्रांनी दिली. त्यामुळे 2007 चं सूत्र मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस उद्याच्या निर्णायक बैठकीत काँग्रेसशी चर्चा करेल. जवळपास 55 जागांवर शिक्कामोर्तब दोन्ही पक्षांचे नेते करतील असं समजतंय. काँग्रेसमधल्या सर्वांमध्येच आघाडीबाबत एकमत झालं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतआघाडीचं सूत्र हे 2007 च्याच निवडणुकीचं असेल. यावर आता राष्ट्रवादीनंही योग्य विचार करावा, तसेच मुंबई महापालिका निवडणूक आघाडीचं सूत्र हे 2007 च्याच निवडणुकीचे असेल यावर आता राष्ट्रवादीनंही योग्य तो विचार करावा असं दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही म्हटलं आहे.

मुंबई महापालिका – एकूण जागा 227 2007 मध्ये काय झालं?

काँग्रेस 71 जागांवर विजयी 99 जागांवर दुसर्‍या क्रमांकाची मतं170 हक्काच्या जागा

राष्ट्रवादी 14 जागांवर विजयी 20 जागांवर दुसर्‍या क्रमांकाची मतं34 हक्काच्या जागा

कुठं अडली आघाडीची चर्चा?- राष्ट्रवादीचा 65 जागावर दावा – आतापर्यंत 46 जागा द्यायला काँग्रेस तयार- राष्ट्रवादीने मागितल्या काँग्रेसच्या क्रमांक 2 च्या जागा- काँग्रेसच्या काही जिंकलेल्या जागांचीही मागणी- त्यामुळे काँग्रेसपुढे पेच

close