अनुजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

January 7, 2012 12:57 PM0 commentsViews: 6

08 जानेवारी

इंग्लंड येथील मँचेस्टरमध्ये अनुज बिडवे या भारतीय विद्यार्थीची ख्रिसमसला हत्या करण्यात आली होती. आज अखेर अनुजचे पार्थिव भारतात आणण्यात आले. आज रात्री आठ वाजेपर्यंत अनुजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातल्या येरवडा स्मशानभूमीमध्ये अनुजच्या पार्थिवावर अंत्सयसंस्कार होणार आहे. अनुजचे पार्थिव आणण्यासाठी अनुजचे आई-वडील दोनदिवसांपूर्वी मँचेस्टरमध्ये दाखल झाले होते. मँचेस्टरमध्ये ज्या ठिकाणी अनुजची हत्या झाली, त्या ठिकाणी काल त्यांनी भेट दिली. त्यावेळी अनुजच्या आईवडिलांना गहिवरून आलं. हा आघात पचवणं आम्हाला खूप अवघड आहे, असं अनुजच्या वडिलांनी सांगितलं. अनुजचं पार्थिव आज पुण्यात आणण्यात आलं. आज संध्याकाळी अनुजच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं अनुजच्या कुटंुबीयांनी सांगितले.

close