महायुतीत सेनेला 136, भाजप 62 तर आरपीआयला 29 जागा

January 9, 2012 9:18 AM0 commentsViews: 10

09 जानेवारी

महापालिकांच्या निवडणुकीसाठी जागावाटपात महायुतीने बाजी मारली. शिवसेनेला 136 जागा, भाजपला 62 तर आरपीयआयला 29 जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. रामदास आठवले यांना आणखी एक जागा वाढवून पाहिजे आहे अशी मागणी आहे. आरपीआयला 30 जागा मिळाव्यात असा आठवलेंचा आग्रह आहे. तर नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरलाही जागा हव्या आहेत. या प्रश्नावर शिवसेना कसा तोडगा काढणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एक नजर 2007 मधल्या जागावाटपावर2007 मध्ये शिवसेनेनं 156 जागा लढवल्या होत्या. म्हणजे यावेळी सेनेच्या 20 जागा कमी झाल्यात तर भाजपने 2007 मध्ये 71 जागा लढवल्या होत्या म्हणजे यावेळी भाजपच्या 9 जागा कमी झाल्या आहेत.

close