पुणे बंद प्रकरणी नीलम गोर्‍हे आणि नार्वेकरांचा आवाज तपासणार

January 9, 2012 9:33 AM0 commentsViews: 2

09 जानेवारी

ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेला धक्का बसला आहे. पुण्यातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळा हटवल्यानंतर झालेल्या पुणे बंद प्रकरणी नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घ्यायला कोर्टाने परवानगी दिली आहे. आज नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांना यासंदर्भात नोटीस जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात येतील असं पोलिसांनी सांगितले आहे.

आज संध्याकाळी या दोघांना शहरातील बंडगार्डवन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोघांवरही 28 डिसेंबरला 2010 ला झालेल्या दादोजी पुतळा आंदोलन प्रकरणी पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान दंगल भडकावण्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी 55 बसेस आणि 5 लाख रुपयांचं नुकरसान झालं होतं. याबाबत नीलम गोर्‍हे यांना प्रतिक्रिया विचारली असता यासंदर्भातली नोटीस आम्हाला मिळाल्यानंतरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. शिवाय याबाबत हायकोर्टात धाव घेणार असल्याचं गोर्‍हे यांनी सांगितलं. अशा प्रकारे फोन टॅप करणे हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा मुद्दा पुढे रेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

close