कांद्या व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

January 7, 2012 1:23 PM0 commentsViews: 5

08 जानेवारी

नाशिकमध्ये कांदा व्यापार्‍यांनी कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना लेव्ही वसुलीच्या नोटीसा बजावल्याने संतापलेल्या व्यापार्‍यांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आधीच कांद्याचे भाव कोसळल्यामुळे हैराण झालेली कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत आले आहे. हे प्रकरण कोर्टात असताना जिल्हाधिकांर्‍यांनी बजावलेल्या या नोटिसा मान्य नसल्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतलीय. तर कोर्टाच्या आदेशानुसार आपण कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकांर्‍यांचे म्हणणं आहे.

close