मुख्यमंत्र्यांच्या घोषणा या मतदारांच्या डोळ्यात धुळफेक -खडसे

January 7, 2012 1:27 PM0 commentsViews: 1

08 जानेवारी

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक घोषणा केल्या. त्यात मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांसाठी तसेच धारावीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मतदारांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या घोषणा करण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच या घोषणा महानगर पालिका क्षेत्रांसाठी लाभदायक अशा घोषणा केल्या आहेत. झोपडपट्टी धारक आणि बिल्डर यांच्या हिताच्या या घोषणा मतांवर डोळा ठेवून करण्यात आल्या आहेत. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्या तरी ग्रामीण भागातील लोकांसाठी कुठलेही निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेले आहे. ऐन आचारसंहितेच्या अर्धा तास आधी घेतलेल्या या निर्णयांचे जीआर सुद्धा काढता येणार नाही. फक्त मतदारांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतले आहेेत. ही मतदारांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.

close