पुस्तकांना वाळवी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – दर्डा

January 7, 2012 1:18 PM0 commentsViews: 11

07 जानेवारी

शालेय विद्यार्थ्यांना वाटपासाठी आणलेल्या जिल्हा परिषदेच्या पुस्तकांना वाळवी लागल्याची घटना आयबीएन लोकमतने दाखवली होती. आयबीएन-लोकमतच्या बातमीची दखल घेत आता या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कारवाईचा इशारा दिला. याआधी नांदेड जिल्हा परिषदेचे सीईओ दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी गोदामाला सील करून पुस्तकाच्या मोजणीचे आदेश दिले होते. केवळ अधिकार्‍यांच्या हलगर्जीमुळेच हा प्रकार घडल्याचं आता उघड झालं आहे. दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची मोजणी झाली आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर यात दोषी अधिकार्‍यांवर कारावाई करु असा इशारा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.

close