राळेगणचे सरपंच राष्ट्रवादीच्या दारी

January 9, 2012 10:17 AM0 commentsViews: 3

09 जानेवारी

अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सगळ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे झालेले राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी सध्या चर्चेत आले आहेत कारण त्यांनी आता अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतलाय आणि ही निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढता यावी यासाठी मापारी यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीही मागितली आहे. अण्णांच्या शरद पवारांविरोधातील भूमिकेमुळे मापारींना उमेदवारी दिली तर फायदा होईल या इच्छेने शिवसेना भाजपने मापारींशी संपर्क साधला होता. पण आपण आधीपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा मापारींनी व्यक्ती केली. तसेच अण्णांनीही आपल्याला राष्ट्रवादीकडून लढण्यास परवानगी दिल्याचा दावा मापारींनी केला आहे.

close