बीडमध्ये जिवंत जाळलेल्या ऊसतोड कामगाराचा मृत्यू

January 9, 2012 10:27 AM0 commentsViews: 4

09 जानेवारी

बीडमधल्या गेवराई तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. इथल्या सिंदफणा-चिंचोली गावात एका ऊस तोडणी कामगाराला जिवंत जाळण्यात आलंय. शहादेव मासोबा तायड असं या मजूराचे नाव आहे. शहादेव हा सांगलीमध्ये ऊसतोडणीच्या कामावर होता. त्याने गेवराईमधल्या वशिष्ठ डाके याच्याकडून पाच हजार रूपये घेतले होते. शहादेव घरी आला असताना त्याचे वशिष्ठबरोबर वाद झाला आणि त्यातून वशिष्ठने शहादेववर रॉकेल टाकून त्याला पेटवून दिलं, असा आरोप शहादेवच्या वडिलांनी केला. यात शहादेव 95 टक्के भाजला होता आणि त्यातच मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. वशिष्ठ डाके याच्याविरोधात तळवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या शोधासाठी दोन पोलीस पथक पाठवण्यात आले आहे.

close