पेस-टिपसारेविक जोडीने पटकावले चेन्नई ओपनचे जेतेपद

January 9, 2012 10:40 AM0 commentsViews: 4

09 जानेवारी

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसनं नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. चेन्नई ओपन स्पर्धेत पेसनं त्याचा जोडीदार यान्को टिपसारेविकच्या साथीनं डबल्सचं जेतेपद पटकावलं आहे. लिएंडर पेस आणि महेश भूपती ही भारताची जोडी विभक्त झाल्यानंतर दोघांनीही नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोडीदारासह केली. पेस-यान्को जोडीनं फायनलमध्ये इस्त्रायलच्या अँडी राम आणि जोनाथन एरलिच जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पेस-यान्को जोडीने सलग तीन गेम जिंकत पहिला सेट आरामात जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही या जोडीने वर्चस्व राखत जेतेपद पटकावले. दरम्यान, चेन्नई ओपनच्या सिंगलमध्ये कॅनडाचा मिलोस रॉनिक विजयी ठरला. फायनलमध्ये त्यानं सर्बियाच्या यान्को टिपसारेविकचा पराभव केला.

close