पुणे फेस्टिव्हलमध्ये आशाताई आणि बिग बींचा गौरव

January 9, 2012 11:04 AM0 commentsViews: 2

09 जानेवारी

येत्या गुरुवारपासून सुरु होणार्‍या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आशा भोसले यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. दरवर्षी दिल्या जाणार्‍या जीवनगौरव पुरस्कारापेक्षा या सन्मानाचे स्वरुप वेगळं असणार आहे. ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना सचिनदेव बर्मन पुरस्कार, तसेच चित्रपट क्षेत्रात 50 वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्यानिमित्ताने सचिन पिळगावकर यांचाही विशेष सन्मान होणार आहे. तर चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

close