शिवसेनेची लाईफलाईन तोडण्यासाठी एकत्र लढावे – भुजबळ

January 9, 2012 12:54 PM0 commentsViews: 6

09 जानेवारी

मुंबई महापालिकेची सत्ता हीच शिवसेनेची लाईफलाईन आहे. सेनेची ही लाईफलाईन तोडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. शिवसेनेच्या हातून मुंबईची सत्ता गेल्यास राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होईलं असा दावा भुजबळ यांनी केला.

महापालिकाच्या निवडणुका आता जवळ येत आहे आणि नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाचा आखाडा आता रंगत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला आघाडीचा इशारा देत कार्यकर्त्यांना कामला लागा असा आदेश दिला. अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या वाक्ययुध्दानंतर आता छगन भुजबळ यांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला. 2007 च्या निवडणुकीत जर राष्ट्रवादीला अधिक वेळ मिळाला असता तर शिवसेना- भाजप मुंबई बाहेर असती. शिवसेनेची ताकद ही फक्त मुंबईत आहे त्यामुळे सेनेची ही लाईफलाईन तोडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. शिवसेनेच्या हातून मुंबईची सत्ता गेल्यास राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होईलं असा दावाही भुजबळ यांनी केला.

close