भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडले आपलेचं कार्यालय

January 9, 2012 1:03 PM0 commentsViews: 4

09 जानेवारी

राज्यभरात निवडणुकांचे वातावरण तापत चालले आहे. एकीकडे नेत्यांच्या बैठका होतं आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना उत्सुक्ता शिंगेला पोहचली आहे. मात्र आज मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. चेंबूर इथल्या जिल्हा कार्यालयाची भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड झाली. वार्ड क्रमांक 134 ची जागा शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यासाठी सोडण्याच्या वादावरुन कार्यकर्ते संतापलेत. त्यामुळे त्यांनी आपल्याच जिल्हा कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

close