राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश

January 9, 2012 2:34 PM0 commentsViews: 6

09 जानेवारी

राष्ट्रवादीच्या पक्ष सहकार्‍यांची बैठक सुरु असतांनाच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील, ठाण्याचे नगरसेवक उमेश पाटील आणि ठाण्याच्याच माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी अनेक पदाधिकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे आणि गोपाल लांडगे उपस्थित होते.

close