नाराज डावखरेंचा पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला

January 9, 2012 2:36 PM0 commentsViews: 6

09 जानेवारी

ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांना लांब ठेवण्यात आल्याने स्वत: डावखरे आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टाकल्याने नाराज डावखरेंनी आपल्या समर्थकांची एक बैठक घेतली. मी नाराज नाही असं जरी डावखरे म्हणत असले तरी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील शिवसेनेत गेल्याने पक्षानंही आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत डावखरेंनी ठाण्यात राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहे.

close