भाजपचे आ.प्रकाश शेंडगे काँग्रेसच्या वाटेवर

January 10, 2012 11:39 AM0 commentsViews: 8

10 जानेवारी

निवडणुकांच्या रणधुमाळीत सोडचिठ्ठी सत्र सर्वच पक्षात सुरु आहे. भाजपचे नाराज आमदार प्रकाश शेंडगे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काल झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे शेडगेंनी सांगितले आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेऊ असं शेंडगेंनी स्पष्ट केलं. गेली दीड तास प्रकाश शेंडगे हे नितिन गडकरी यांच्या घरी त्यांची वाट पाहत बसले आहेत. पण शेंडगे घरी असताना नितीन गडकरी यांनी घराबाहेर राहणं पसंत केलंय. शेंडगे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटणं हे गडकरींना आवडलं नाही.

close