नीलम गोर्‍हे आणि नार्वेकरांना तात्पुरता दिलासा

January 10, 2012 12:10 PM0 commentsViews: 3

10 जानेवारी

पुण्यातील दादोजी कोंडदेव पुतळा हटवल्यानंतर पुण्यातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळा हटवल्यानंतर झालेल्या पुणे बंद प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सेशन्स कोर्टाने त्यांना चार आठवड्याचंी मुदत दिली आहे. त्यामुळे 4 आठवडे पोलिसांना दोघांचे आवाजाचे नमुने घेता येणार नाहीत. दादोजी पुतळा आंदोलन प्रकरणी नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घ्यायला कोर्टाने परवानगी दिली होती. त्याविरोधात हायकोर्टात धाव घेण्यासाठी दोघांनी मुदत मागितली आहे. ोघांवरही 28 डिसेंबरला 2010 ला झालेल्या दादोजी पुतळा आंदोलन प्रकरणी पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान दंगल भडकावण्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी 55 बसेस आणि 5 लाख रुपयांचं नुकरसान झालं होतं.

close