बाबा रामदेव करणार काँग्रेसविरोधात प्रचार

January 9, 2012 5:18 PM0 commentsViews: 2

09 जानेवारी

टीम अण्णा उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार का यावर प्रश्नचिन्हं असलं तरी योगगुरु बाबा रामदेव मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशासह विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाचही राज्यात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रातीच्या दिवशीच प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. देशाला लुटणार्‍या कुठल्याच व्यक्तिला विधानसभेवर पाठवू नका, असा संदेश देणार असल्याचं बाबांनी सांगितले.

close