औरंगाबादेत संभाजी सेना आणि छावाच्या कार्यकर्त्यात हाणामारी

January 10, 2012 12:26 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

औरंगाबादमध्ये संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम सुरु असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी संभाजी सेना आणि छावा संघटना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यामध्ये तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे.जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज औरंगाबादेत तापडिया नाट्यगृहात संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोध करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात घुसन जोरदार घोषणाबाजी करत स्टेजकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सावध होत कार्यकर्त्यांवर झडप घातली.पण संतापलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. छावाच्या कार्यकर्त्यांनी मिर्चीची पूड उधाळून कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीत तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे. छावाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला का केला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

close