उत्तर प्रदेशात 3 फेब्रुवारीला होणार मतदान

January 9, 2012 5:31 PM0 commentsViews: 2

09 जानेवारी

राज्यात महापालिकांचा तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम रंगला आहे. पण निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेत थोडा बदल केला आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी 4 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता पहिल्या टप्प्यातीलं मतदान 3 फेब्रुवारीला होणार आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला मोहम्मद पैगंबरांची जयंती येत आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही तारीख बदलण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 60 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. नव्या तारखेमुळे आता मतमोजणीची तारीखही 4 मार्चऐवजी 6 मार्च करण्यात आली आहे.

close