गोपीनाथ मुंडे,दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर तरुणाने घेतलं पेटवून

January 10, 2012 12:36 PM0 commentsViews: 44

10 जानेवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या भगवान गडावर भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात एका तरुणानं पेटवून घेतलं.या कार्यक्रमाला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पंकजा पालवे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडली. दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरू असताना सुनील महादेव बारगजे या तरुणानं पेटवून घेतलं. सुनील हा अंबड इथला रहिवासी आहे. त्याचे वडील राजाराम बापू साखर कारखान्यात ऊसतोडणी कामगार म्हणून काम करतात. गेल्या तीन महिन्यांपासून कारखान्याच्या लोकांनी आपल्या वडिलांना डांबून ठेवल्याचा आरोप सुनीलने केला आहे. वडिलांची सुटका व्हावी यासाठी सुनीलने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने कोर्टात अर्ज करून सुनीलने वडिलांच्या सुटका करावी, अशी मागणी केली. पण कोणतीच कारवाई होत नसल्याने निराश होऊन सुनीलने आज स्वतःला जाळून घेतलं. तो 70 टक्के भाजला आहे. सुनिलला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close