काँग्रेस जि.प.साठी स्वबळावर लढणार ?

January 10, 2012 1:45 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. पण मुंबईत आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसला 55 च्या आसपास जागा काँग्रेस सोडायला तयार आहेत. तसेच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची निर्णायक बैठक काही वेळातच सुरू होणार आहे. आघाडी करून युतीचा पराभव केला, तर देशभर भाजपविरोधी संदेश जाईल अशी मुख्यमंत्र्यांची आशा आहे.

दरम्यान,स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन आघाडीची अंतिम निर्णय काँग्रेस घेणार आहे. काँग्रेस तडजोडीला तयार पण शरणागती पत्करणार नाही. अशा शब्दात माणिकराव ठाकरेंनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी 65 जागांची मागणी करत असली तरी 55 जागांच्या आसपास तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती उच्चपदस्त सूत्रांनी दिली. त्यामुळे 2007 चं सूत्र मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस उद्याच्या निर्णायक बैठकीत काँग्रेसशी चर्चा करेल. जवळपास 55 जागांवर शिक्कामोर्तब दोन्ही पक्षांचे नेते करतील असं समजतंय. काँग्रेसमधल्या सर्वांमध्येच आघाडीबाबत एकमत झालं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतआघाडीचं सूत्र हे 2007 च्याच निवडणुकीचं असेल.

close