तडजोडी करु पण शरणागती पत्करणार नाही – माणिकराव ठाकरे

January 10, 2012 9:55 AM0 commentsViews: 4

10 जानेवारी

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आता निर्णयाक वळणावर येऊन ठेपला आहे. दोन्ही पक्षांच्या नेते एकत्र येऊन आघाडीबाबातचा तिढा सोडवण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन आघाडीची अंतिम निर्णय काँग्रेस घेणार आहे. काँग्रेस तडजोडीला तयार पण शरणागती पत्करणार नाही. अशा शब्दात माणिकराव ठाकरेंनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी 65 जागांची मागणी करत असली तरी 55 जागांच्या आसपास तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती उच्चपदस्त सूत्रांनी दिली. त्यामुळे 2007 चं सूत्र मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस उद्याच्या निर्णायक बैठकीत काँग्रेसशी चर्चा करेल. जवळपास 55 जागांवर शिक्कामोर्तब दोन्ही पक्षांचे नेते करतील असं समजतंय. काँग्रेसमधल्या सर्वांमध्येच आघाडीबाबत एकमत झालं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतआघाडीचं सूत्र हे 2007 च्याच निवडणुकीचं असेल. यावर आता राष्ट्रवादीनंही योग्य विचार करावा,असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कालच स्पष्ट केलं.

close