ऊसतोडणी मजूर जळीतप्रकरणी वशिष्ट डाकेला अटक

January 10, 2012 9:05 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी

बीडमधल्या गेवराई इथल्या ऊसतोडणी मजूर जळीत प्रकरणी आरोपी वशिष्ठ डाके याला अटक करण्यात आली आहे. तलवाडा पोलिसांनी डाके याला आज पहाटे पाच वाजता अटक केली. आज दुपारी दोन नंतर त्याला गेवराई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रंजेगाव चिंचोली गावात शहादेव म्हसोबा तायडे या ऊसतोडणी मजुराला वाशिष्ठ डाके यानं रॉकेल पेटवून जाळलं होतं.शहादेवनं डाकेकडून पाच हजार रुपये घेतले होते. शहादेव सांगली इथं ऊसतोडणीसाठी गेला होता. तो घरी आला असताना त्याला जाळण्यात आलं. दरम्यान, शहादेव याच्या कुटुंबीयांना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणाचा लवकर तपास करावा अशी सूचनाही केली आहे.

close