जयजयकार पुतण्यांच्या डोक्यात गेला – बाळासाहेब

January 10, 2012 10:15 AM0 commentsViews: 9

10 जानेवारी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण्यातल्या पुतण्यांवर सडकून टीका केली. आज प्रसिद्ध झालेल्या त्याच्या मुलाखतीच्या तिसर्‍या भागात त्यांनी पुतण्यांना टार्गेट केलंय.' पुतणे हा जो प्रकार आहे तो एका इर्षेतून निर्माण झाला आहे. जवळीक असल्यामुळे इर्षा निर्माण झाली. त्यांच्यामध्ये काही नाही, त्यांच्यामध्ये विचार नाही, आचार नाही तर ते फक्त एका मस्तीत जाऊ इच्छितात. कारण जवळीक असल्यामुळे त्यांनी तो सगळा जनसमुदाय,जयजयकार पाहिलेला असतो आणि हे त्यांच्या डोक्यात गेलेला असतो आणि हे असं आपल्याला व्हायला हवं अशी इर्षा त्यांच्यात निर्माण होते' अशी टीका बाळासाहेबांनी केली.

close