पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

January 10, 2012 2:27 PM0 commentsViews: 2

10 जानेवारी

पुणे महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही. यावरुन आता युतीच्या नेत्यांची भूमिका फारशी स्पष्ट दिसत नाही. भाजपशी युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेनं ठेवली आहे असा दावा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केला. त्यावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनाही उत्तर दिलं आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा करावी, पण आमची भूमिका युती करण्याची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. पण भाजपमध्येही गोंधळ दिसतोय. जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्याच्या नेत्यांना उद्या मुंबईत बोलावले आहे. पण 11 तारखेला मुंबईत बैठक असल्याची आपल्याला माहितीच नाही, असं विकास मठकरी यांनी सांगितले आहे. त्यापूर्वीच जागावाटपाचा हा घोळ अजूनही सुरु आहे. तोडगा लवकर निघाला नाही, तर स्वबळावर जाण्याची भाषा आता नेते करु लागले आहेत.

close