शिव वडापावचे स्टॉल्स झाकण्याची नितेश राणेंची मागणी

January 10, 2012 6:21 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

उत्तर प्रदेशात जसं मायावतींच्या पुतळ्यांवर समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला होता, तसा मुंबईत शिव वडापावच्या स्टॉल्सवर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. हे स्टॉल्स शिवसेनेची स्कीम आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे हे स्टॉल्स झाका अशी मागणी नितेश राणेंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने मायावतींच्या पुतळ्यांवर आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोगाने याची दखल घेत राज्यातील मायावती आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह हत्तीचे सर्व पुतळे झाकण्याचे आदेश दिले. आता पर्यंत सर्व पुतळे झाकण्यावर लाखो रुपये खर्च झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईने सर्वच पक्षानी धसका घेतला आहे. मात्र सर्व सामान्यातून या निर्णयाचे स्वागत झाले आहे आता नितेश राणे यांनी केलेली मागणीवर निवडणूक आयोग दखल घेते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

close