मुंबईत आघाडीवर शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीला 58 जागा

January 10, 2012 4:44 PM0 commentsViews: 3

10 जानेवारी

अखेर काँग्रेस- राष्ट्रवादीची जागावाटपाचा तिढा सुटला आहे. मुंबईत महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीराष्ट्रवादीच्या पदरात 58 जागा पडल्या आहे. तर काँग्रेस 169 जागावर लढणार आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र लढणार आहेत. यावेळी शिवसेनेची 17 वर्षाच्या सत्तेला जनता कंटाळली आहे जनतेला संपूर्ण विकास आणि संपूर्ण सुविधा देण्यासाठी आघाडी कटीबध्द राहील त्यासाठी शिवसेनेची सत्ता उलटून लावू असा दावा आघाडीने एकमुखाने केला.

मागिल आठवड्यापासून सुरु असलेल्या आघाडीच्या चर्चेतून आज आघाडीचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीने 65 जागाची मागणी केली होती आणि त्यावर ठाम राहत शरद पवार यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिला होता. पवारांच्या या इशार्‍यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत स्वबळावर लढण्याचे उद्गार काढले. मात्र गेली कित्येक वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता मोडून काढण्यासाठी आघाडी होणे गरजेचे आहे असा अनुभवी सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तर काँग्रेसच्या गोटातून खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जागावाटपाची दोर साभाळात दिल्ली दरबारी हजेरी लावून आघाडी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. अखेर आज संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली आणि तडजोड करुन आघाडी झाली. आजच्या अंतिम बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते हजर होते. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंग हे नेते उपस्थित होते तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड,छगन भुजबळ,जयंत पाटील,सचिन अहिर,नरेंद्र वर्मा उपस्थित होते.

close