जीआरपी पोलिसाविरोधातील टीसींचे आंदोलन स्थगित

January 10, 2012 5:24 PM0 commentsViews: 2

10 जानेवारी

पुण्यात जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र देशमुख यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तिकीट निरीक्षकांनी सुरू केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं आहे. या प्रकरणात मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर रेल्वे तिकीट चेकर वेलफेअर असोशिएशन आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कर्मचार्‍यांनी धरणं आंदोलन मागे घेतलं. पण देशमुख यांच्याविरुध्द कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा टीसी संघटनेनं दिला आहे. मुंबई जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र देशमुख हे डेक्कन क्वीननं विना तिकीट प्रवास करत होते. त्यावेळी तिकीट निरीक्षक मीनाक्षी साळुंके यांनी त्यांना दंड आकारला होता. त्यामुळे देशमुख संतापले. आणि डेक्कन क्वीन पुण्यात पोचल्यानंतर त्यांनी साळुंके यांना जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये नेलं. देशमुख यांची ही कृती चुकीची असल्याचा आरोप करत टीसींनी आंदोलन सुरू केल होतं.

close