पुण्यात मनसे उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

January 10, 2012 5:27 PM0 commentsViews: 103

10 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे आणि पिंपरी-चिचवड महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे. दहा ते बारा जानेवारीपर्यंत राज ठाकरे पुण्यात जवळपास एक हजार उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. आज जवळपास दोनशे उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यांनी सोबत आपण केलेल्या कामांचे प्रोफाईल आणले होतं. मुलाखती पूर्ण झाल्यावर सर्व पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.

close