नवी मुंबईत 6 नवे स्काय वॉक

November 20, 2008 12:47 PM0 commentsViews: 4

22 नोव्हेंबर, मुंबईविनय म्हात्रेनवी मुंबई शहरातूनच मुंबई पुणे महामार्ग जातो. महामार्गाच्या एका बाजूस औद्योगिक पट्टा तर दुसर्‍या बाजूस वसलेलं शहर यामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका शहरातील गर्दीच्या ठिकाणी सहा स्कायवॉक उभारणार आहे. नव्यानं उभारण्यात येणार्‍या नवी मुंबईच्या आकर्षक प्रवेशद्वाराचा वापरही स्कायवॉकसाठी केला जाणार आहे.मुंबई प्रमाणेच अनेक शहरांमध्ये स्कायवॉक उभारले गेले. पण त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. हीच परिस्थिती नवी मुंबईत होऊ नये, म्हणून महापालिकेनं गोलाकार पध्दतीच्या या स्कायवॉक मध्ये पाऊस, ऊन, आणि धुळी पासून प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली आहे. या स्काय वॉकमध्ये जिन्या बरोबरच लिफ्टही असणार आहे. एका स्कायवॉकसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च येणार आहे. नव्वद मीटर लांबी असलेल्या या स्कायवॉकमधून एकावेळी दोन हजार प्रवासी ये-जा करु शकतील. शहरातील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ प्रमाणं वाशी आणि ऐरोली या प्रवेशव्दारावरही स्कायवॉक उभारण्यात येणार आहेत.नवी मुंबईला आधुनिक सुविधा दिल्या गेल्यात, आता स्कायवॉक देखील परदेशी तंत्राने उभारले जाणार आहेत. या सहाही स्कायवॉकसाठी तीस कोटी रुपये खर्च येणार आहे. महापालिकेनं फक्त दहाच कोटींची तरतूद केल्यामुळं उर्वरित रकमेसाठी खाजगी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. अनेक देशात उभारण्यात आलेल्या स्कायवॉकच्या तंत्राचं मिश्रण या स्कायवॉकमध्ये करण्यात आलंय. यामुळं हा स्कायवॉक हा आगळा वेगळा ठरणार असल्याचं या कंपनीच्या आर्किटेक्टचं म्हणणं आहे. नवी मुंबईतील महामार्गावरील या कायवॉकच्या उभारणीमुळे अपघाताच्या संख्येत मोठी घट होणार आहे. आता प्रवासी या स्कायवॉकची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

close