अखेर मुंबईत आघाडीवर शिक्कामोर्तब

January 10, 2012 5:52 PM0 commentsViews: 7

10 जानेवारीअखेर काँग्रेस- राष्ट्रवादीची जागावाटपाचा तिढा सुटला आहे. मुंबईत महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या पदरात 58 जागा पडल्या आहे. तर काँग्रेस 169 जागावर लढणार आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र लढणार आहेत. यावेळी शिवसेनेची 17 वर्षाच्या सत्तेला जनता कंटाळली आहे जनतेला संपूर्ण विकास आणि संपूर्ण सुविधा देण्यासाठी आघाडी कटीबध्द राहील त्यासाठी शिवसेनेची सत्ता उलटून लावू असा दावा आघाडीने एकमुखाने केला.

मागिल आठवड्यापासून सुरु असलेल्या आघाडीच्या चर्चेतून आज आघाडीचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीने 65 जागाची मागणी केली होती आणि त्यावर ठाम राहत शरद पवार यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिला होता. पवारांच्या या इशार्‍यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत स्वबळावर लढण्याचे उद्गार काढले. मात्र गेली कित्येक वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता मोडून काढण्यासाठी आघाडी होणे गरजेचे आहे असा अनुभवी सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तर काँग्रेसच्या गोटातून खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जागावाटपाची दोर साभाळात दिल्ली दरबारी हजेरी लावून आघाडी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. अखेर आज संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली आणि तडजोड करुन आघाडी झाली. आजच्या अंतिम बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते हजर होते. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंग हे नेते उपस्थित होते तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड,छगन भुजबळ,जयंत पाटील,सचिन अहिर,नरेंद्र वर्मा उपस्थित होते.

आघाडीच्या बैठकीतलं महानाट्य

- जवळपास अडीच तास चालली बैठक- काँग्रेस : मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंग- रा.काँग्रेस : मधुकरराव पिचड, छगन भुजबळ, जयंत पाटील, सचिन अहिर, नरेंद्र वर्मा- 7 वाजून 55 मिनिटांनी झाली बैठकीला सुरुवात- राष्ट्रवादीनं 65 जागांची मागणी रेटून धरली- काँग्रेसची ऑफर मात्र 55 जागांची- यावरच झाला एक तास खल- रात्री 9 वाजता सुरु झाली पक्षश्रेष्ठींशी फोनाफोनी- मुख्यमंत्र्यांनी केली मोहन प्रकाश यांच्याशी केली फोनवर चर्चा- भुजबळांनी केली शरद पवारांशी बातचीत- 9 वाजून 5 मिनिटांनी पुन्हा दोन्ही पक्ष आले समोरासमोर- आता राष्ट्रवादीची मागणी 65 वरुन 63 वर आली- पुन्हा 63 या आकड्यावर 20 मिनिटं खल झाला- काँग्रेस मात्र 55 आकड्यावर कायम- 9 वाजून 25 मि. – पुन्हा खणखणले पक्षश्रेष्ठींचे फोन- मधुकरराव पिचड यांनी घेतला अजित पवारांचा कौल- चर्चेला पुन्हा सुरुवात, राष्ट्रवादीनं तीन जागांवरचा दावा सोडला- पण काँग्रेस काही माघार घेईना, 55 जागांचा आग्रह कायम- पाऊण तास उलटला, 60 या आकड्यावरुन चर्चेचं गाडी पुढे सरकेना- 10 वाजून 10 मि. – पुन्हा भुजबळांनी लावला शरद पवारांना फोन- पवारांनी शेवटची ऑफर भुजबळांना सांगितली- राष्ट्रवादीनं 58 जागांच्या खाली येण्यास दिला नकार- अखेर झाला काँग्रेसचा नाईलाज, 58 जागांची मागणी मान्य- घड्याळात वाजले होते रात्रीचे साडेदहा- शेवटच्या 15 मिनिटांत झाला आघाडीचा निर्णय

close