मँचेस्टरमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

January 10, 2012 6:15 PM0 commentsViews: 3

10 जानेवारी

अनुज बिडवे प्रकरण ताजं असतानाच इंग्लंडमधल्या मँचेस्टरमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. गुरदीप हायर असं विद्यार्थ्याचं नाव आहे. वेस्ट ब्रॉमविचमध्ये राहणारा गुरदीप मँचेस्टरमध्ये 2 जानेवारीपासून बेपत्ता होता. सोमवारी त्याचं पार्थिव सापडलं. आणि आज त्याची ओळख पटवण्यात आली. गुरुदीपच्या पार्थिवावर या आठवड्याच्या शेवटी पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरदीपला नाईट क्लबमधून नेणार्‍या टॅक्सी ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या टॅक्सी ड्रायव्हरनंच गुरदीपला शेवटचं पाहिलं होतं. 26 डिसेंबर रोजी मँचेस्टरमध्येच पुण्याच्या अनुज बिडवेची हत्या झाली होती.

close