कडाक्याचा थंडीचा द्राक्षांना फटका

January 11, 2012 2:28 PM0 commentsViews: 1

कपिल भास्कर, नाशिक

11 जानेवारी

नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा फटका द्राक्षांना बसतोय. निफाडसारख्या द्राक्षाच्या पट्‌ट्यातच विक्रमी थंडी पडली आहे. बागांमध्ये शेकोट्या पेटवून शेतकरी ही द्राक्षं वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. नाशिक म्हणजे द्राक्ष हे समीकरण तयार झालं कारण नाशिकचं थंड हवामान. पण नाशिकची ही थंडी सध्या एवढी वाढलीय की थंडी हवी असणार्‍या द्राक्षांलाही त्याचा फटका बसतोय. द्राक्षासाठी प्रसिद्ध निफाड तालुक्यातच सर्वात जास्त थंडी पडली आहे. निफाडजवळच्या कुंदेवाडीतल्या कृषी संशोधन केंद्रातल्या नोंदीनुसार इथलं तापमान 2.8 सेल्सीअस डीग्रीपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहे. त्यावर रोग पडतायत, त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. इतरांसाठी गुलाबी वाटणारी थंडी द्राक्ष उत्पादकांसाठी मात्र धडकी भरवणारी ठरतेय.

close