सोनिया गांधींनी विकत घेतलं उल्हासनगरमधून रॉकेल !

January 11, 2012 4:36 PM0 commentsViews: 9

11 जानेवारी

''काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी उल्हासनगरच्या रेशन दुकानातून दोन वेळा रॉकेल विकत घेतलंय''…चमकू नका किंवा अविश्वासही दाखवू नका…पण हे खरं आहे.. फक्त सोनिया गांधींच्या नावावर कुणीतरी बोगस रेशन कार्ड काढून हा उद्योग केला आहे. विशेष म्हणजे रेशन कार्डवर 10 जनपथ, दिल्ली असा पत्ताही आहे आणि उल्हासनगरमधल्या या कार्डवर सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही नावं आहेत. त्यात त्यांचं वार्षिक उत्पन्न दिलंय ते 30 हजार रु….! ठाणे रेशनिंग ऑफिसमधून हे कार्ड देण्यात आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रेमचंद झा यांना हे रेशनकार्ड उल्हासनगर महानगरपालिकेत सापडलं. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती काढली. 7 ऑगस्ट 2011 ला हे रेशनकार्ड देण्यात आलंय आणि ज्या व्यक्तीकडे हे रेशन कार्ड आहे त्यानं दोन वेळा रेशन दुकानातून दोन वेळा रॉकेलही घेतलंय…..!

close