‘ओल्या वेळूची बासरी..’, ग्रेस वाचकांच्या भेटीला

January 11, 2012 7:59 AM0 commentsViews: 42

11 जानेवारी

कवी ग्रेस यांच्या ओल्या वेळूची बासरी या नव्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. कवी ग्रेस यांच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच या हॉस्पिटलमध्ये कँसरशी लढा देऊ शकलो, असं ग्रेस यावेळी म्हणाले. आपला हा ललित लेखांचा संग्रह त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमधल्या वास्तव्याला आणि मंगेशकर यांना हा संग्रह अर्पण केला आहे.

close