औरंगाबादेत अँटी करप्शन विभागाची धाड

November 20, 2008 2:51 AM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, औरंगाबादऔरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेल्या सहायक विद्युत निरीक्षक अशोक रामप्रकाश वर्मा यांच्या उल्कानगरी घरावर अ‍ॅन्टी करप्शन विभागानं रेड टाकली. झडतीमध्ये रोख 16 लाख 7 हजार 230 रुपयाची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. शिवाय त्यांच्या नावावर गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे 10 एकर 21 गुंठे शेती, औरंगाबाद शहरातील शहानूरवाडी येथे 2 प्लॉट आणि जालना रोडवर कुबेर अवेन्यू नावाचे दुकान असल्याचं आढळून आलंय. या सर्व ठिकाणी झडतीचे काम सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानूसार अशोक वर्मा आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर जवाहर नगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close