अल्पसंख्याकांच्या 4.5%आरक्षणाला स्थगिती

January 11, 2012 5:07 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

उत्तर प्रदेश निवडणुकीत मुस्लिम मतदारांवर डोळा असणार्‍या काँग्रेसला निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला. विधानसभा निवडणूक होणार्‍या पाच राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या कोटा अंतर्गत कोटाच्या निर्णयाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. गेल्या 22 डिसेंबरलाच केंद्र सरकारने अल्पसंख्याकांसाठी साडे चार टक्क्यांचे उप आरक्षण दिलं होतं. केंद्र सरकारच्या नोकरभरतीत ओबीसींना आरक्षण देण्यात आलंय. या आरक्षणातच साडेचार टक्के आरक्षण अल्पसंख्याकांना देण्यात आलं होतं. पण निवडणूक आयोगाने हा निर्णय स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. केंद्र सरकारच्या या घोषणे वरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसची ही खेळी मुस्लिम मतदारांची व्होट बँक बळकावण्यासाठी आमिष असल्याचा आरोप विरोधाकांनी केला होता. दरम्यान दिल्लीत झालेली बाटला हाऊस चकमक बनावट असल्याचे खुद्द काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला. तर भाजपनंही कोटा अंतर्गत कोटावरुन पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केलं.

close