ठाण्यात 2 नगरसेवकांचा राष्ट्रवादीला रामराम

January 11, 2012 10:10 AM0 commentsViews: 1

11 जानेवारी

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुधीर भगत आणि माजी नगरसेविका सुनिता सातपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडत असल्याचा आरोप दोघांनीही केला आहे. आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षातून गळती सुरुच आहे अजूनही काही कार्यकर्ते इच्छुक उमेदवार इतर पक्षंच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत दोन आजी-माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मनमानीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे दशरथ पाटील यांनी म्हटलं आहे. तर तिकडे विधान परिषदेचे आमदार सुभाष भोईर हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोईर हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.

close