मुंबई मॅरेथॉनच्या चॅरिटीत 12 कोटी जमा

January 11, 2012 5:27 PM0 commentsViews: 3

11 जानेवारी

मुंबई मॅरेथॉनचे पडघमही आता शहरात वाजू लागले आहे. यंदा 15 जानेवारीला म्हणजे या रविवारी मुंबई मॅरेथॉन होणार आहे. मुंबई मॅरेथॉन आशियातली सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन मानली जाते. चॅरिटीतही ही मॅरेथॉन नवे रेकॉर्ड रचतेय. आणि यंदा 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतनिधी मॅरेथॉनच्या निमित्ताने आतापर्यंत जमा झाला आहे आणि ही रक्कम 15 कोटी रुपयांच्या घरात जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यावेळी गायक शानही उपस्थित होता. 185 समाजसेवी संस्था या मॅरेथॉनशी जोडलेल्या आहेत. आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. तसेच यंदाच्या मॅरेथॉनच्या रुटही यावेळी रेस डायरेक्टर ह्युज जोन्स यांनी जाहीर केला. या मॅरेथॉनमध्ये आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंनी आपला सहभागही निश्चित केला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने यावर्षी स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा दिला आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या बक्षिसेच्या रकमेत 25 हजार डॉलरनी वाढही करण्यात आली आहे.

close