नाशकात अपक्ष नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

January 11, 2012 11:31 AM0 commentsViews: 2

11 जानेवारी

नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेत गेल्यावेळी किंगमेकरची भूमिका बजावलेले अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. स्थायी समितीचे सभापती शरद कोशीरे, सुनिल बोराडे यांच्यासह संजय साबळे यांनी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. या प्रवेशांमुळे काँग्रेसशी वाटाघाटी करताना राष्ट्रवादीचं वजन वाढलं आहे. चौथे अपक्ष नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत.

close