धोणीचे टेस्टमधून निवृत्तीचे संकेत

January 12, 2012 9:09 AM0 commentsViews:

12 जानेवारी

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीलाही आता टेस्ट, वन डे आणि टी 0-20चा ताण एकत्रपणे सहन होत नाही. म्हणूनच यापैकी एका फॉरमॅटमधून म्हणजे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार तो करतोय. यापूर्वीही त्याने असं सुतोवाच एकदा केलं होतं. 2015चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा असेल तर तीनही फॉरमॅट सातत्याने खेळणं शक्य नाही असं धोणीला वाटतं आहे. भारतीय टीमने 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यावर आमचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीतही धोणीने टेस्टमधून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. 2013 मध्ये तीनही फॉरमॅट खेळायचे का यावर आपण अंतिम निर्णय घेऊ असं धोणीने म्हटलं आहे.

close