दलित महिलेला मारहाण प्रकरणी चौकशीचे आदेश

January 12, 2012 6:10 PM0 commentsViews: 2

12 जानेवारी

राज्य महिला आयोगान सातार्‍याच्या घटनेचा राज्य सरकारकडून महिला आयोगाने अहवाल मागवला आहेत. तसेच सातारा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अतिरिक्त गृहसचिव उमेशचंद्र सरंगींनी दिले आहे. या प्रकरणी अतिरीक्त पोलीस अधिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात सोमवारी एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली होता.या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. विधवा महिलेच्या मुलाचे गावातल्याच मुलीशी प्रेमसंबध होते. एक महिन्यापुर्वी मुलगा आणि मुलगी दोघे पळून गेले. याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईंकानी या महिलेला पानवठ्यावर मारहाण केली. या घटनेनंतर अनेक दलित संघटनांनी संताप व्यक्त केला. दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येते आहे. तर या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्र्यी कमालीचे असंवेदनशील आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद राहलीये.पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करायला दिरंगाई केली.सोमवार – घटना घडलीमंगळवार – रात्री उशीरा किरकोळ गुन्हा दाखलबुधवार – मीडियाच्या दबावानंतर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल आणि रात्री उशीरा 5 जणांना अटक

close